“प्रेरणा विचारातून नाही, कृतीतून घडते…” समाजात बदल घडवायचा असेल तर तो केवळ विचारांनी नाही, तर ठोस कृतीने घडतो, या ठाम विश्वासातून एकविरा फाउंडेशनची सुरुवात करण्यात आली.समाजातील प्रत्येक व्यक्ती, विशेषतः महिला, सक्षम झाली तरच खऱ्या अर्थाने प्रगती शक्य आहे. याच जाणिवेतून आम्ही महिलांना केवळ प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना कौशल्य, संधी आणि आत्मविश्वास देणारी एक संपूर्ण व्यवस्था उभी केली आहे. आज एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो महिलांनी स्वतःचा मार्ग शोधला आहे. काहींनी छोट्या उद्योगांची सुरुवात केली, काहींनी कुटुंबाला आर्थिक आधार दिला, तर काहींनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. हे सर्व केवळ यश नसून एक सशक्त सामाजिक परिवर्तन आहे.
सेवा हीच खरी शक्ती आहे, आणि समाजपरिवर्तन हेच खरे ध्येय आहे – डॉ. जयश्री थोरात
एक सक्षम, सुशिक्षित आणि आत्मनिर्भर समाज निर्माण करणे, जिथे प्रत्येकाला समान संधी, शिक्षण आणि सन्मान मिळेल. महिला व युवक हे बदलाचे वाहक असतील.
नव्या दिशेने
एकविरा फाउंडेशन सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हतेवर कार्यरत. शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्प्रेरक म्हणून काम करतो.
आमचे मूल्य
सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता.
प्रेस नोट्स व बातम्या
एकविरा फाउंडेशनचे नवीन उपक्रम व कार्यक्रम
२५ मार्च २०२६
७६० महिलांना शिवण प्रशिक्षण प्रमाणपत्र
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते महिला सक्षमीकरणासाठी शिवण प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण.